१३ नोव्हेंबर, २०१० रोजी मा.वि.सं ने 'रॅपलिंग' आणि 'स्लिदरिंग'(उडत्या हेलिकॉप्टर मधून दोरीच्या साहय्याने खाली उतरणार्या कमांडोज चे फोटो पाहीले असतीलच...त्यालाच 'स्लिदरिंग' म्हणतात) बद्दल माहिती आणि प्रात्यक्षिक शिबीर आयोजित केले होते. अर्थातच त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
'हाइकिंग','रॅपलिंग' हे शब्द साहसप्रेमींना नेहमीच रोमांचकारक वाटतात. मग माजी विद्यार्थी संघ त्याला अपवाद कसा राहू शकेल???आपल्यापैकी बर्याच जणांना अशी एखादी activity करावी असं नेहमीच वाटत असेल पण प्रत्यक्षात असं काही करायला मिळेलच असं नाही. नेमकी हीच गोष्ट लक्षात घेऊन मा.वि.सं. ने या कार्यक्रमाचा आराखडा बांधला. ज्यांनी या शिबीराचा लाभ घेतला त्यांनी खूपच चांगल्या प्रतिक्रिया दिल्या व असे कार्यक्रम दरवर्षी व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली. मा.वि.सं. या सूचनांचा नक्कीच विचार करेल.
ही activity यशस्वी होण्यामागे अनेकांचा हातभार लागला त्या सर्वांबद्दल मा.वि.सं. आभारी आहे...Let's keep it up!!!!!
MVS succesfully conducted 'Rappling' and 'Slithering' activity on 13th of November,2010.It received a whooping response!!!
In general,'hiking','rappling' are the words which can refresh every youthful mind.How members of MVS would be an exception to it? Many of us wish to go for such an adventourous ride but never get to do so in actual.MVS provided an opportunity to all with this activity.MVS has always been trying to come up with newer and fresher activities may it be for a social cause or be it a cultural event.This activity was just a next step to continue.
This much awaited event came to real with over a month of valuable and constant efforts.MVS is greatful to all those who played their role in making this event a great success....Let's keep it up..
Venue:SVVM,Dattanagar school.
Date:13th November,2010
छोटीसी ओळख........
- माजी विद्यार्थी संघ
- माजी विद्यार्थी संघाच्या (मा. वि. सं ) ब्लॉगमध्ये आपले स्वागत. स्वामी विवेकानंद विद्यामंदिर,विष्णूनगर शाळेच्या माजी विद्यार्थी संघाची स्थापना 1995 मध्ये डोके मॅडम यांनी काही विद्यार्थ्यांच्या मदतीने केली. तेव्हापासून गेली 14 वर्षे मा.वि. सं सामाजिक,सांस्कृतिक,शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रांत आपला ठसा उमटविण्यात यशस्वी झाला आहे. सध्या जग बरंच फास्ट झालंय. इंटरनेटच्या या युगात सर्वांशी कनेक्टेड राहण्यासाठी एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म मिळावा , फोटोज व व्हिडीओज शेअर करता यावेत यासाठी हा खटाटोप. ज्यांना मा. वि. सं च्या कार्यात प्रत्यक्ष सहभागी होता येत नाहीये पण इच्छा मात्र खूप आहे त्यांना मा. वि. सं च्या कार्यक्रमांची माहिती इथे मिळेल. मा. वि.सं च्या ऑर्कुट कम्यूनिटीला नक्की भेट द्या. (click on the link below) http://www.orkut.co.in/Main#Community.aspx?cmm=8970605 लोभ आहेच तो वृद्धिंगत व्हावा हीच आशा.
Subscribe to:
Post Comments (Atom)
3 comments:
अप्रतिम अप्रतिम.. अभिनंदन.. मस्त उपक्रम.. !!
एक सूचना करू? खरं तर दोन.. एक म्हणजे काळी बॅकग्राउंड बदलता आली तर बघ. डोळ्याला खूप त्रास होतो. आणि दुसरी आणि सगळ्यांत महत्वाची गोष्ट म्हणजे मराठीत लिहीत जा. किंवा हवं तर मराठी आणि इंग्रजी दोन्ही असुदे एका खाली एक. पण मराठी हवंच. मराठी टंकायला काही प्रॉब्लेम्स असतील तर मला सांग.. मी काहीही मदत करायला तयार आहे.
हेरंब...सूचनेबद्दल आभार..बॅक ग्राऊंड बद्दल विचार केला होता. पण या टेंप्लेट मध्ये बॅक ग्राऊंड कस्टमाईज करता येत नाही.not a blogger template. टेम्प्लेटच बदलावी लागेल. मी पण मनासारखी नवी टेंप्लेट शोधतच आहे..तू एखादी सूचवू शकलास तर बघ...आणि ब्लॉग ची भाषा मराठीच असेल. फक्त काहींना मराठी फॉन्ट्स चा प्रॉब्लेम होत होता म्हणून इंग्लीश मधे पोस्ट केलं होतं...आणि हो..अशाच सूचना येऊ देत. आभार.
ओके.. मीही टेम्प्लेट शोधायला लागतो चांगली.. आणि कळवतो..
Post a Comment