छोटीसी ओळख........

माजी विद्यार्थी संघाच्या (मा. वि. सं ) ब्लॉगमध्ये आपले स्वागत. स्वामी विवेकानंद विद्यामंदिर,विष्णूनगर शाळेच्या माजी विद्यार्थी संघाची स्थापना 1995 मध्ये डोके मॅडम यांनी काही विद्यार्थ्यांच्या मदतीने केली. तेव्हापासून गेली 14 वर्षे मा.वि. सं सामाजिक,सांस्कृतिक,शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रांत आपला ठसा उमटविण्यात यशस्वी झाला आहे. सध्या जग बरंच फास्ट झालंय. इंटरनेटच्या या युगात सर्वांशी कनेक्टेड राहण्यासाठी एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म मिळावा , फोटोज व व्हिडीओज शेअर करता यावेत यासाठी हा खटाटोप. ज्यांना मा. वि. सं च्या कार्यात प्रत्यक्ष सहभागी होता येत नाहीये पण इच्छा मात्र खूप आहे त्यांना मा. वि. सं च्या कार्यक्रमांची माहिती इथे मिळेल. मा. वि.सं च्या ऑर्कुट कम्यूनिटीला नक्की भेट द्या. (click on the link below) http://www.orkut.co.in/Main#Community.aspx?cmm=8970605 लोभ आहेच तो वृद्धिंगत व्हावा हीच आशा.

Sunday, May 8, 2011

छंदवर्ग २०११...

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माजी विद्यार्थी संघाने लहान मुलांसाठी 'छंदवर्ग २०११' आयोजित केला,ते सोबत खूप सारी धमाल,मजा,मस्ती घेऊनच...!!!
सुट्टीमध्ये धमाल,मजा,मस्ती करायला कोणाला आवडत नाही?पण मजा करत असतानाच मुलांना काहीतरी चांगले शिकायलाही मिळावे या उद्देशातून 'छंदवर्ग' ही कल्पना आली.या वर्षी छंदवर्ग २२ एप्रिल २०११ ते २५ एप्रिल २०११ या कालावधीत स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, दत्तनगर येथे घेण्यात आला.यामध्ये Wire Sculptures,Glass painting,Sand painting,Science Games,wall Magazine ,Picnic हे sessions घेण्यात आले.यास पालकांचा तसेच लहान मुलाचा उत्तम प्रतिसाद लाभला.

Monday, January 17, 2011

'शब्द स्वरांचे देणे'

१६ व्या वर्धापनदिनानिमित्त माजी विद्यार्थी संघ आपल्यापुढे घेऊन येत आहे......सुरेल,सुमधुर,संगीतमय कार्यक्रम....'शब्द स्वरांचे देणे'

सादरकर्ते:

केतन पटवर्धन,केतकी भावे आणि वा. न. सरदेसाई

दिनांक: शनिवार,५ फेब्रुवारी,२०११

वेळ: सायंकाळी ६ वाजता

स्थळ: सर्वेश हॉल(तळमजला),डोंबिवली(पूर्व).

Keep watching for more updates....

Wednesday, January 12, 2011

MVS completing 16 years.....

Hurray...it's time to celebrate again...MVS completing 16 years.....It's been a superb journey with the support of you all...On this occasion,MVS decided to bring an event full of pleasure and excitement..Need more info on this?? secret to be revealed soon...keep watching this place for updates....

'रॅपलिंग' आणि 'स्लिदरिंग'('Rappling' and 'Slithering' )

१३ नोव्हेंबर, २०१० रोजी मा.वि.सं ने 'रॅपलिंग' आणि 'स्लिदरिंग'(उडत्या हेलिकॉप्टर मधून दोरीच्या साहय्याने खाली उतरणार्‍या कमांडोज चे फोटो पाहीले असतीलच...त्यालाच 'स्लिदरिंग' म्हणतात) बद्दल माहिती आणि प्रात्यक्षिक शिबीर आयोजित केले होते. अर्थातच त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
'हाइकिंग','रॅपलिंग' हे शब्द साहसप्रेमींना नेहमीच रोमांचकारक वाटतात. मग माजी विद्यार्थी संघ त्याला अपवाद कसा राहू शकेल???आपल्यापैकी बर्‍याच जणांना अशी एखादी activity करावी असं नेहमीच वाटत असेल पण प्रत्यक्षात असं काही करायला मिळेलच असं नाही. नेमकी हीच गोष्ट लक्षात घेऊन मा.वि.सं. ने या कार्यक्रमाचा आराखडा बांधला. ज्यांनी या शिबीराचा लाभ घेतला त्यांनी खूपच चांगल्या प्रतिक्रिया दिल्या व असे कार्यक्रम दरवर्षी व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली. मा.वि.सं. या सूचनांचा नक्कीच विचार करेल.
ही activity यशस्वी होण्यामागे अनेकांचा हातभार लागला त्या सर्वांबद्दल मा.वि.सं. आभारी आहे...Let's keep it up!!!!!



MVS succesfully conducted 'Rappling' and 'Slithering' activity on 13th of November,2010.It received a whooping response!!!
In general,'hiking','rappling' are the words which can refresh every youthful mind.How members of MVS would be an exception to it? Many of us wish to go for such an adventourous ride but never get to do so in actual.MVS provided an opportunity to all with this activity.MVS has always been trying to come up with newer and fresher activities may it be for a social cause or be it a cultural event.This activity was just a next step to continue.
This much awaited event came to real with over a month of valuable and constant efforts.MVS is greatful to all those who played their role in making this event a great success....Let's keep it up..

Venue:SVVM,Dattanagar school.
Date:13th November,2010

Saturday, July 3, 2010

काही सांगायचं होतं

'बदल' हा समाजाचा मूळ पाया आहे. म्हणूनच प्रत्येक क्षेत्रात कालांतराने बदल होणारच. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात काळानुरूप काही चांगले-वाईट परिणाम होणार; मात्र त्याबद्दल नाकं मुरडता कामा नयेत, असे मत सिनेअभिनेता अतुल कुलकर्णी यांनी येथे व्यक्त केले.

"राष्ट्रीय शिक्षण संस्थे'च्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, विष्णूनगर शाखेच्या "माजी विद्यार्थी संघा'तर्फे घेण्यात आलेल्या "काही सांगायचं होतं...' या मुलाखतपर कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी अतुल कुलकर्णी आणि सिनेअभिनेत्री अमृता सुभाष यांची मुलाखत अमरेंद्र पटवर्धन यांनी घेतली.

या वेळी अमृता सुभाष यांनी "देवराई' आणि "वळू' चित्रपटातील काही प्रसंग कथन करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. "राजकारण, समाजकारण आणि मराठी चित्रपटांची आजच्या काळातील अवस्था' या विषयावर अतुल यांनी आपली परखड मते व्यक्ती केली. राजकीय प्रगल्भता केवळ राजकारण्यांसाठीच नव्हे, तर जनतेसाठीदेखील आवश्‍यक आहे, असे त्यांनी नमूद केले.

या वेळी त्यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटांत काम करताना आलेल्या अनुभवांचे कथन केले.

"अवघाचि संसार'मुळे प्रकाशझोतात आलेल्या अभिनेत्री अमृता सुभाष यांनी सध्यातरी ही मालिका बंद करण्याचा दिग्दर्शकाचा विचार नाही, असे सांगितले. केवळ प्रेक्षकांच्या पसंतीमुळे तीन वर्षे ही मालिका सुरू आहे, असे त्या म्हणाल्या. रसिकांच्या आग्रहाखातर अतुल कुलकर्णी यांनी "सरफरोशी की तमन्ना', तर अमृताने "पानिसा निर्मल हो मेरा मन' ही गाणी सादर करून रसिकांची मने जिंकली.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार संजय केळकर यांनी भूषविले. राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. खर्डेकर, स्वामी विवेकानंद विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका दीपाली काळे उपस्थित होत्या.

Thursday, July 1, 2010

'संकल्प'- जुलै २०१०

आपल्यापैकी बर्‍याच जणांना सतत काहीतरी चांगलं लिहिण्याची किंवा वाचण्याची आवड असते..वाचनाबाबत म्हणाल तर जवळपास बर्‍याच लायब्ररीज उपलब्ध आहेत..पण लिहिण्याबद्दल काय??? शाळेत असेपर्यंत ठीक होतं...मी काही मोठा लेखक नाही मग माझं लिखाण कोण वाचणार?? कोण छापणार???...असा प्रश्न साहजिकच मनात येत असेल.. नेमका हाच धागा पकडून मा.वि.सं. ने आपल्यातील लेखक-वाचक मंडळींना 'संकल्प' या मुखपत्राद्वारे एक 'हक्काचं व्यासपीठ' तयार करून दिलंय!!!
'संकल्प'(म्हणजेच आपली स्मरणिका) वर्षातून दोनदा प्रकाशित होत असते.(जानेवारी आणि जुलै). तशी 'जुलै २०१०' च्या 'संकल्प' साठी लेख गोळा करणे सध्या चालू आहे.लेख लिहिण्यासाठी अट एकच...'लेख लिहिण्याची इच्छा'.. इतर सर्व मदत करण्यासाठी संपादक व इतर मंडळी आहेतच....आणखी एक..लेख लिहिण्यासाठी विषयाची मर्यादा नाही...तर मग उचला पेन आणि तुमच्यातल्या कवी-लेखकाला सर्वंसमोर येऊ द्या.... वाट बघतोय...
संपर्क: गौरव पांडे ('संकल्प'-संपादक)९८२१३१२७३९

गरजू विद्यार्थी मदत योजना २०१०-११

Maji vidyarthi sangh has started "Garju Vidyarthi Madat Yojna 2010-11" for Swami Vivekanand Vidyamandir School .Under this scheme we raise money for students who are unable to pay their school fees.In this way we can contribute those students to get their right to education.
I hope you will contribute to our social work for help of educational development of poor students.


This scheme works in two ways :-
# Adoption :- In this scheme you can adopt student by paying their annual school fees around Rs.875
# Donation :- You can donate amount from Rs.10 onwards
You can also contribute us in this activity by giving Donation or by adoption .The receipt will be given for the help given by you.

Contact :-
Devendra Patil :- 9821629254



माजी विद्यार्थी संघाने दरवर्षीप्रमाणे स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाळेसाठी ' गरजू विद्यार्थी मदत योजना २०१०-११ ' सुरु केली आहे.या योजनेद्वारे शाळेतील गरीब विद्यार्थ्यांची शालेय फी भरण्यासाठी मा.वि.सं. कडून मदत केली जाते.याद्वारे या मुलांच्या शिक्षणास मदत केली जाते.
हे होतकरू विद्यार्थी निव्वळ आर्थिक दुरावस्थेमुळे शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी आपणही सामाजिक बांधिलकीचे भान ठेऊन आमच्या या मदत कार्यास हातभार लावावा हि नम्र विनंती ..

ही योजना २ पातळींवर कार्य करते.
# पालकत्व :- याद्वारे आपण विद्यार्थ्याचे पालकत्व घेऊन त्याची संपूर्ण शालेय फी भरू शकता.एक पालकत्व सुमारे रु.८७५ चे असेल.
# देणगी :-आपण रु.१० पासून कितीही देणगी देऊ शकता.
आपण दिलेल्या देणगीची रीतसर पावती आपणास सुपूर्त करण्यात येईल याची नोंद घ्यावी..

आमच्या या कार्यात आपणही देणगी अथवा पालकत्व घेऊन सहभाग घेऊ शकता.
संपर्क :-
देवेंद्र पाटील :- ९८२१६२९२५४

Saturday, March 27, 2010

पथनाट्य- नववर्ष स्वागत यात्रा २००९

मा. वि. सं. पथनाट्य
मा. वि. सं ने हे पथनाट्य गुढीपाडव्यनिमित्त 'नववर्ष स्वागत यात्रा २००९' मध्ये सादर केलं होतं. याला अपेक्षेपेक्षाही जास्त प्रतिसाद मिळाला...बघा यातले चेहरे ओळखता येतायत का????