आपल्यापैकी बर्याच जणांना सतत काहीतरी चांगलं लिहिण्याची किंवा वाचण्याची आवड असते..वाचनाबाबत म्हणाल तर जवळपास बर्याच लायब्ररीज उपलब्ध आहेत..पण लिहिण्याबद्दल काय??? शाळेत असेपर्यंत ठीक होतं...मी काही मोठा लेखक नाही मग माझं लिखाण कोण वाचणार?? कोण छापणार???...असा प्रश्न साहजिकच मनात येत असेल.. नेमका हाच धागा पकडून मा.वि.सं. ने आपल्यातील लेखक-वाचक मंडळींना 'संकल्प' या मुखपत्राद्वारे एक 'हक्काचं व्यासपीठ' तयार करून दिलंय!!!
'संकल्प'(म्हणजेच आपली स्मरणिका) वर्षातून दोनदा प्रकाशित होत असते.(जानेवारी आणि जुलै). तशी 'जुलै २०१०' च्या 'संकल्प' साठी लेख गोळा करणे सध्या चालू आहे.लेख लिहिण्यासाठी अट एकच...'लेख लिहिण्याची इच्छा'.. इतर सर्व मदत करण्यासाठी संपादक व इतर मंडळी आहेतच....आणखी एक..लेख लिहिण्यासाठी विषयाची मर्यादा नाही...तर मग उचला पेन आणि तुमच्यातल्या कवी-लेखकाला सर्वंसमोर येऊ द्या.... वाट बघतोय...
संपर्क: गौरव पांडे ('संकल्प'-संपादक)९८२१३१२७३९
छोटीसी ओळख........
- माजी विद्यार्थी संघ
- माजी विद्यार्थी संघाच्या (मा. वि. सं ) ब्लॉगमध्ये आपले स्वागत. स्वामी विवेकानंद विद्यामंदिर,विष्णूनगर शाळेच्या माजी विद्यार्थी संघाची स्थापना 1995 मध्ये डोके मॅडम यांनी काही विद्यार्थ्यांच्या मदतीने केली. तेव्हापासून गेली 14 वर्षे मा.वि. सं सामाजिक,सांस्कृतिक,शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रांत आपला ठसा उमटविण्यात यशस्वी झाला आहे. सध्या जग बरंच फास्ट झालंय. इंटरनेटच्या या युगात सर्वांशी कनेक्टेड राहण्यासाठी एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म मिळावा , फोटोज व व्हिडीओज शेअर करता यावेत यासाठी हा खटाटोप. ज्यांना मा. वि. सं च्या कार्यात प्रत्यक्ष सहभागी होता येत नाहीये पण इच्छा मात्र खूप आहे त्यांना मा. वि. सं च्या कार्यक्रमांची माहिती इथे मिळेल. मा. वि.सं च्या ऑर्कुट कम्यूनिटीला नक्की भेट द्या. (click on the link below) http://www.orkut.co.in/Main#Community.aspx?cmm=8970605 लोभ आहेच तो वृद्धिंगत व्हावा हीच आशा.
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
वा छान झालाय ब्लॉग. मस्तच !! अभिनंदन !!!
आता नियमित अपडेट करत रहा.. अगामी कार्यक्रम, साप्ताहिक बैठकांचे अहवाल, प्रकल्पांचे अहवाल, नवीन सूचना/घोषणा सगळं येउदेत इथे. माविसं पासून 'अंतराने' दुरावलेल्या परंतु 'अंतराने' एकरूप असलेल्या लोकांना रविवारच्या बैठकांना, कार्यक्रमांना पुन्हा हजेरी लावल्यासारखं वाटेल.
एक छोटी सूचना, काळी बॅकग्राउंड बदलता आली तर बघा. वाचायला थोडा त्रास होतो. बाकी सगळं उत्तम.. शुभेच्छा !!!
Post a Comment